परेश दादाचा कोंकण दौरा, आम्ही फिरवलं दापोली ft @Story on Wheels | #storyonwheels #bts #gopro #vlog
Moto Vlog | Story on Wheels | Youtube Influencer | Kokan | Explore kokan | Raigad | Ratnagiri | Sindhudurg | Thane | Coastal ride | BTS | Go pro | Vlogging | Swargiya kokan | Summer ride | Coast to Coast | Travelling | KTM | KTM Adventure 250 | Malvan | Mumbai Goa highway
नमस्कार मित्रांनो,
TRAVELMOODY चा नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे. हा व्हिडीओ थोडासा वेगळा आहे. Moto vlogging हे लहान आणि तरुणांना नेमीच अचंबित करत. हेल्मेट ला GoPro लावून अनेक मंडळी हिंदी आणि इंग्रजी मधून YouTube वर moto vlog करतात. असाच एक तरुणाने मराठी vlogging ने कमी वेळात मनात घर केले आहे. त्याचे शब्द, मराठीचा अभिमान, editing magic, अभंग आपल्याला त्याचा सर्व व्हिडिओ मध्ये आढळतात.
तो म्हणजे story on wheels aka परेश प्रकाश शिंदे.
त्याचा लाल परी वरून त्याने अनेक मस्त असे ट्रॅव्हल व्हिडिओ बनवले आहेत.
Explore kokan या त्याच्या नवीन series मध्ये coast to coast ride करत तो आला दापोली मध्ये आपल्या campsite वर. हा व्हिडिओ परेश दादाच्या vlog चा Behind the scene असा समजा. केशवराज मंदिराचे वर्णन, हर्णे बंदरावरील लिलाव व कोळी बांधवांची व्यथा, पाजपंढरी जवळील sunset point हे सर्व सुंदररित्या दादाने व्हिडिओ द्वारे मांडले आहे ते सुद्धा नक्की पहा!
द बिच कॅम्पिंग @ पाळंदे बीच, दापोली विथ ट्रॅव्हल मूडी
कॅम्प साईट बद्दल माहिती :
विडिओ मधील कॅम्प ग्राउंड हे पाळंदे बीच दापोली येथे आहे. हा बीच दापोली मधील पर्यटकांचं आकर्षण केंद्र आहे. स्वच्छ असा हा बीच स्विमिंग, सनबाथ, कॅम्पिंग साठी उत्कृष्ट आहे. लांबच लांब किनारा, गार वाळू आणि नारळाच्या बागा हे सर्व मनाला शांती देतात. बीचवर तुम्ही क्रिकेट, फुटबॉल आणि व्हॉलीबॉल खेळू शकता किंवा मग हर्णै बंदचा मासळी लिलाव बघायला जाऊ शकता. सकाळी वॉटर स्पोर्ट्स, डॉल्फिन सफारी,केशवराज मंदिर किंवा सुवर्णदुर्ग किल्ला तुम्ही करू शकता. रात्री मोकळ्या आकाशाकडे पाहून चांदणं पाहू शकता किंवा संध्याकाळी कॅम्पिंग करताना शेकोटीच्या बाजूला बसून लोकांन बरोबर गप्पा मारू शकता. आपली कॅम्प साईट ही बाइकर्स, बॅकपॅकर्स, कॉलेज स्टुडंट्स, फॅमिली साठी सोयीस्कर आहे.
Campervan, Caravans पार्किंग साठी विशेष सोय इथे आहें
राहायची व्यवस्था :
टेंट किंवा होम स्टे जागेवर उपलब्ध आहेत
टेंट हे पाळंदे बिचच्या बाजूला लावण्यात येतील.
२ लोकं शेअर करू शकतात अशी टेंट ची व्यवस्था आहें. जागेवर टॉयलेट उपलब्ध आहेत.
अधिक माहिती:
ट्रॅव्हलमूडी च्या दापोली आणि आंबा घाट अश्या सध्या दोन campsite आहेत, भविष्यात अजून campsite विकसित करण्यासाठी ट्रॅव्हलमूडी टीम चा मानस आहें.
For Bookings and Query please contact us :
Mobile: Nikhil Pathre +91 8108131860
Omkar Pangerkar +91 97024 79159